पृष्ठे

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

तो राजहंस एक .....

​कालचा भारत पाकिस्तान ची T  20 चा सामना ज्याने बघितला नसेल तो कमनशीबीच समजेल मी .कालच्या सामन्यासाठी सगळी बिरुदे अपुरी थिटी ठरतील असा ha सामना. 

विराटची खेळी पाहतांना का त्याला सर्व स्रेष्ठ समजावे हे कळले .कमालीचा आत्मविश्वास ,एक प्रकारचा जिद्दी आत्मविश्वास .मी हे करू शकेल असे नव्हे तर मी हे करणारच अन हेच माझे काम आहे. बापरे ....त्याच्या प्रत्येक कृतीतून हे ठळक पणे व्यक्त होत होतं .

आमच्या पिढीने तेंडुलकरला पाहिलेला ,त्याची खेळी अशीच पण मला एक सूक्ष्म फरक नमूद करावासा वाटतो.तेंडुलकर असाच सर्वोत्तम सार्वकालीन ,प्रचंड अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारा .मी तर म्हणेन असे ओझं व्हायची कोणाची कुवत नाही अन असे अपेक्षांचं अक्षरशः संपूर्ण भारतीयांचं अपेक्षांचं ओझं tyane वाहिलंय .म्हणजे सगळी टीम जरी परतली अन तेंडल्या असेल तर प्रत्येक भारतीय निश्चिन्त असायचा कि सचिन आहे ना .पण आज मला जरा वेगळं सांगायचं आहे .

सचिन जरी अश्या परिस्थितीत कूल असायचा ,tyachya खेळी त सच्चाई असायची ,जिंकून देऊ अशी त्याची तळमळ असायची परंतु त्याच्या कडून अशी खेळी कधीतरीच भेटली बघायला .आता विराटला घेऊ ,सचिनचे जे काही गुण  मी सांगितले ashya परिस्थितले ,सगळे सेम परंतु या पुढे विराट चालू होतो .विराटकडे भयंकर जिद्द आहे अन हट्टीपणाही कि मी हा सामना जिंकणार ....किंबहुना हे माझे कर्तव्य आहे .अन अश्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची खेळी अधिकच बहरते .

सचिनचा मी निस्सीम चाहता आहे परंतु विराट एका पावलाने त्याच्यापेक्षा सरस आहे हे मी मानतो .

असो

कालच्या सामन्याने बऱ्याच गोष्टी साध्य केल्यात.ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य माणूस महागाईने पिचलेला होता ,हंगर  इंडेक्स मध्ये भारताची पीछेहाट ,डॉलर च्या तुलनेत खोल गर्तेत गेलेला रुपया असे अनेक नैराश्य पसरवणाऱ्या वातावरणात विराटची हि खेळी एक आश्वासक फुंकर आहे ,एक दुर्दम्य विश्वास आहे कि जाईल हि पण वाईट परिस्थिती सरेल . अन प्रत्येक भारतीयाला ha संदेश आहे कि स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा ,कितीही प्रतिकूल वातावरण असू दे ,स्वतःवर विश्वास अन ताबा असेल तर सहज ह्या परिस्थिती वर आपण विजय संपादन करू.

या दशकातील या खेळीला सर्व स्रेष्ठ  मानतो मी.त्यात तिला भारत पाकिस्तान हा विशेष कंगोरा आहे.

शेवटी जाता जाता विराटच्या खेळी बद्दल एकच म्हणता येईल ...शानदार ....जबरदस्त .....झिंदाबाद ....

दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....


विवेक पगारे 

पुणे -21


रविवार, १९ जून, २०२२

फादर्स डे.....

फादर्स डे......
मला हे पाश्चात्यांचं खूप आवडतं की कुणाबद्दलही कृतदनत्यां व्यक्त करायला ते उगीच कंजूष पणा करीत नाहीत....ज्याने त्याने आपल्यावर उपकार केले आहेत किंवा आपले जीवन ज्या मुळे सुकर झाले आहेत त्याबद्दल ते खुल्या मनाने अभिप्राय देतात. फादर्स डे त्यापैकीच एक.
म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत आपणही आभार किंवा कृतज्ञाता व्यक्त करतो पण ती अंग चोरून किंवा लपून छपून... पाश्चात्य संस्कृतीत असे नाही,जेही कराल ते दिल खोलके... हेच मला भावतं... नाहीतर तुमच्या मनात खूप आहे पण तुम्ही बोलत नाही मग ते काय उपयोगाचं?असो..
आपण आता आजच्या फादर्स डे बद्दल बोलू..बऱ्याच जणांना आपल्या वडिलांबद्दल आदर असतो पण ते शब्दात वगक्त करीत नाहीत...अहो आजचा जमाना सगळं संगण्याबद्दल आहे ,नाही की लपवण्याबद्दल...खरे तर जुना जमानाही असाच होता पण तो या आनंदाला वंचित राहिला.पण आज तसे नाही,बऱ्याच गोष्टी आहेत आजकाल..तुम्ही व्यक्त होऊ शकतात कुठेही अन कसेही...अन गरज आहे याची.
आजकाल जीवन बिनभरवश्याचे झालेले आहे कधीही काही होऊ शकते...त्यामुळे मनी आलेले विचार लगेच सांगितले पाहिजेत किंवा हे जे त्यासाठी दिन झालेले आहेत त्या दिवशी तरी किमान सांगितले पाहिजे नाहीतर नन्तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.
मी तर म्हणेन ,जर तुम्हाला एखाद्याबद्दल कृतदनात्या व्यक्त करायची असेल तर तुम्ही उशीर करू नका...सांगा लगेच नाहीतर उशीर होईल.
असो...आजच्या फादर्स डे बद्दल..माझे खरे स्फूर्तिस्थान माझे वडीलच..त्यामुळेच मी घडलो... आज ते हयात नाहीत परंतु त्यांची कायम स्मृती स्मरणात राहील....

सोमवार, २ मे, २०२२

ती...स्वमग्न...

ती होतीच तशी...
म्हणजे तशी नव्हे...
आता तुम्ही विचाराल की काय बोलतोय कळते का...?
अरे हो जरा दमाने घ्या..
मला म्हणायचंय की ती तशी खूप खट्याळ,बोलकी अन स्वप्न वेडी...
पण झालं असच काहीतरी
तर ही झाली एकदम गंभीर अन अबोल
खरं तर ती गंभीर नाही कधीही
पण परिस्थितीने अन तीच्या व्यक्तिमत्वाने तिला अबोल केलंय..
म्हणजे बघा, ती पूर्वी गुंतलेली कामात अन त्यामुळे ती व्यस्त तसेच आत्मनिर्भर...
परंतु येन केन कारणाने तिचे काम गेले, अन तिला सगळेच सुनेसुने वाटू लागले
सवय तिची स्वावलंबी
त्यामुळे तिला रिकामे कसेसेच वाटायचे
अन या सगळ्याचा परिपाक तिच्या बदलण्यात झाला
अन विशेष म्हणजे ह्या एवढ्या बदलाची कुणीही दखल घेतली नाहीं तो एक वेगळाच मनस्ताप...
हळूहळू स्वभाव अबोल अन गंभीर झाला
खुलायची बरका ती तशी वातावरण खेळकर असतांना
परत काही आठवल्यावर बावरायची अन पुन्हा जायची स्वमग्नतेत.....
स्वाभिमानी असल्याने तिला माहिती की तिला जमणार नाही इतरांसारखे काहीही घर बसल्या उट पटांग कामे करायला..
त्यामुळे कोमेजूनच गेली ती....
ठीक आहे,पण नको करू एवढा मनस्ताप
मला खूप वाटते तिच्याबद्दल,पण हा समाज...
असू द्या,या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तर हक्काने वरेल तिला ....

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

महाभारताचा नाही तर पुरोगामी भारताचा भीम....

नाही म्हणजे खर सांगायचं ठरलं तर ही एक जागतिक आश्चर्याची च घटना आहे.
तळा गाळातून कोणी एक जन्माला येतो काय अन कित्येक शेकडो हजारो लाखो वर्षांपासूनची किळसवाणी गुलामी उखडून टाकतो काय...सर्वच अकल्पनिय...!
त्याआधी पण बरेच जण आलेले,बऱ्याचदा सवर्ण च,पण त्यांनी असे करू नका तसे करू नका हाच वांझोटा उपदेश दिलेला....अपवाद छत्रपती शाहू महाराज...पण असा कोणी माईका लाल नव्हता की जो शड्डू ठोकून उभा राहिल या वर्षानुवर्षापासून चालत असलेल्या भिकार आणि केविलवाण्या समाजाविरोधात...
होय,मी केविलवानाच म्हटलोय.. कारण कोणीही जेव्हा एखाद्या सदोदित दाबून ठेवल्यावर अजून अत्याचार करतो ,झुंडशाहीने किंवा इतर मार्गाने म्हणजे हातात काही राखून ठेवायचे अन त्यावरून दडपायचे ह्याला मी केविलवाणे च म्हणणार किंवा दम असेल तर समोरासमोर लढा ना,का उगीच लपायचे त्या शिखंडीसारखे...
पण माझा भीम उभा राहिला अन नुसता उभाच नाही तर या प्रस्थापितांना आडवे केले ...
अहो विचार करा,तुम्ही चालताहेत अन तुमच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटू नयेत म्हणून पाठी एक झाडू बांधलेला आहे..बापरे काय तो प्रकार अन मला त्या सडक्या मेंदूची कीव येतेय की असे विचार त्या कुजक्या मनात येऊ शकतात..म्हणजे तथाकथित प्रगत (प्रगत हा शब्द कौतुकाचा नाहीये,हातात हेतुपुरस्सर लेखणी राखून ठेवायची अन पुढच्याला त्यापासून दूर ठेऊन त्यालाच कमी लेखायचे असे हे पाखंडी प्रगत..) माकडांनी हा जो किळसवाणा खेल मांडला होता त्याला या भीमाने जे रामबाण उत्तर दिले त्या गोष्टीचा मी दिवाणा आहे.
म्हणजे पुढच्या काडीला तोडून छोटी न करता त्याने स्वतःच त्या भिकार काडीपेक्षा मोठे होऊन तिला खुजे ठरविले..त्याने दाखवून दिले ज्ञान म्हणजे कोण्या ऎर्या गैरयांची मक्तेदारी नाही,त्यावर हक्क आहे सर्वांचा...अन त्यातही कोणालाही त्यात उच्च होता येते त्यासाठी कोणतेही निर्बंध नाही..मला अजूनही विशेष वाटते,ज्या काळात हे विचार करणेही अवघड तिथे भीमाने करून दाखवले....बापरे खरंच अकल्पनिय...सगळेच स्वप्नातीत..
ह्या सूर्य जाळसमोर काजवे,रातकिडे पार जळून गेले,राख झाली त्यांची..
त्याने सिद्ध केले,बुद्धिमत्ता कुणाची मक्तेदारी नाही .ती एक कामधेनू आहे ,कुणीही जा,आपले कर्तृत्व सिद्ध करा आणि तिचा आस्वाद घ्या अन तीही नाही म्हणणार नाही...मुक्तपणे ती आपले ज्ञानरुपी दूध पाजेल त्याला...त्यासाठी उचचवर्णीय असावा असा निकष तिच्याकडे नाही...
यापूर्वी बरेच जणांनी मलम पट्टी केली परंतु ती स्वार्थासाठी असल्याने तिचे रूपांतर चळवळीत झाले नाही.पण भीमाने ज्योत पेटवली...तिचे रूपांतर एक वडवनलात केले...आपल्या सर्वांनी ती ज्योत पेटती ठेवली पाहिजे..ज्याप्रमाणे काही मंदिरांत पूर्वीपासून तेवत आलेल्या ज्योती जिवंत ठेवलेल्या आहेत...त्याला मी एक रूपक म्हणेन पण आपण त्यापेक्षा ही जिवंत,बुद्धिरूपी ज्योत कायम तेवत ठेवूया अन तीच खरी गोष्ट या भीमाला अभिप्रेत असेल...
करू जल्लोष,करू साजरा आनंद आपण उद्या,पण मनात ती ज्योत तेवत ठेवूया...अन तीच खरी आदरांजली ठरेल....
जय शिवराय जय भीम....

गुरुवार, १० मार्च, २०२२

माझी बहिण माझी दुसरी आई....

प्रिय दीदी,(जरी मी मोठा तुझ्यापेक्षा,तरी मला तू आदरस्थानी),
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा....
असं फॉर्मल होणं मला पटत नाही पण जे जिवापलीकडचे लोकं आहेत त्यांना कधी तरी कृतज्ञातेने साद घातलीच पाहिजे,भले त्यांना आवडो न आवडो....कारण आजकालच्या बेभरवश्याच्या युगात निदान आपल्या माणसांना तरी आपण थोडी त्यांच्या कार्याची पावती दिलीच पाहिजे किंबहुना ती गरज आहे काळाची...
अशी माझी बहिण,जशी दुसरी माझी आई..तिचा दरारा काय सांगावा, अजूनही मी तिला ,तिच्या विचारांना पहिले प्राधान्य देतो.कसे असते सांगू का?जर कोणीही तुम्हाला कोणताही स्वार्थ न ठेवता अगदी निस्वार्थ भावनेने,तुम्ही चुकीचे असला तरीही तुमच्या मागे खंबीर उभे ठाकतो ना,तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीस देवासमान लेखतात.... इथं एक गोष्ट सांगतो...जेव्हा तुम्ही चुकीचे असाल तेव्हा ही सगळ्यांसमोर साथ देईल पण एकांतात तुमची खरडपट्टी काढेल अन सांगेल तुम्ही कसे चुकलात...हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.त्यामुळे तर ती माझ्या आई समान आहे.अन विशेष म्हणजे या तिच्या समतल स्वभावाचा दरारा आहे,उगीच नाही माझी पोरं अजूनही तिला दबकतात त्यांच्या आई पेक्षाही...
मी सदोदित नोकरीमुळे बाहेर राहिलो,पण निर्धास्त होतो कारण ती आहे...तिने कधीही माझी उणीव भासू दिली नाही.इव्हन माझ्या बायकोची अत्यंत विश्वासू अन भरवश्याची मैत्रीण बनली ती,माझ्या मुलांचे लाड करावे तिनेच.तिचा आदरयुक्त दरारा आहे,अन माझ्या मुलांनाच नाही,किंवा पत्नीलाच नाही तर मलाही आहे... ती आहे तशीच...
स्वतःचे सगळे दुःख पचवून ती उभी आहे एखाद्या पहाडासारखी आमच्या मागे,ती आहे म्हणून मी निश्चित आहे.....
खरं तर मी खूप भाग्यवान अशी बहीण मला भेटली.....
माझ्या या बहिणीस ...नाही माझ्या दुसऱ्या माऊलीस वाढशिवसाक्सच्या खूप खूप शुभेच्छा......😊

रविवार, ६ मार्च, २०२२

स्वत्व....

काल कोणीतरी मला म्हटलं की काय राव एकटेच राहतात.कधीतरी कुणामध्ये मिसळा,सगळ्यांना समजावून घ्या.
मी मनातच हसलो...अरे मी अजून मलाच समजलो नाही अन बेट्या तू बाकीच्यांची बात करतो आहेस....त्याला दाखवले नाही पण एक फॉर्मलिटी म्हणून ok म्हटलो.
पण या विषयावर मी जेव्हा विचार करू लागलो तर उडालोच...
खरंच माणूस स्वतःला ओळखतो का आयुष्यभर? कारण तो नेहेमीच गुंतलेला सगळ्यांच्या विचारात अन स्वतःच्या विवंचनेत.त्याला नेहेमीच चिंता स्वतःची अन दुसऱ्याच्या प्रगतीची... हा हा हा विनोदाचा भाग सोडू पण खरं सांगा की माणूस कधी स्वतःला ओळखतो का? कधी स्वतःला प्रश्न करतो? कधी आत्मपरीक्षण करतो?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बहुतेक नाहीच येतील दुर्दैवाने...
मला खूप हसू येते... की यत्किंचिन्त जीवन,त्यात कधी काय होणार माहिती नाही अन तरीही मूढ मनुष्य आत्मप्रौढी करतो.
अन असेही नाही,अनेक उदाहरणे समोर. पण मला अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे की काय विचार असतील बरे याचे?
अन विशेष म्हणजे या विचारात मी गुरफटतो....अन अजून एकाकी होतो.
परवा मला एक जण विचारत होता की तुम्ही एवढे फिरता तर कुठले देश पाहिलेत?पुन्हा मी मनाशीच हसलो ,अरे बाबा अजून माझा देशच इतका विविधतेने नटलेला आहे की त्याला जर पहायचे ठरले तर एक नाही अनेक जन्म थिटे पडतील अन तू दुसरे देश घेऊन बसलायएस.... अरे बाबा मान्य की सगळे फिरले पाहिजे पण उगीच जायचे अन शिवून यायांचें हा आपला प्रांत नाही बाबा....मी कुठेही जातो पण ते ठिकाण सगळे माझ्यात सामावतो त्याशिवाय ती भेट मला परिपूर्ण वाटत नाही...
असो. .भरकटलो नेहेमीप्रमाणे.हे असेच मी संगतो काय अन कुठं भरकटतो असाच...नेहेमीचेच... अर्धवट मी ,कुठल्याही विषयावर असेच अर्धवट ठेऊन कुठेही जाणार....सॉर
पण तुम्ही ठाम रहा....
माझे काय,कुठलाही विषय परिपूर्ण नाही.
तर काय बोलत होतो? अरे हो...
सगळ्यांशी बोला,मिसळा वगैरे
पण मला एक सांगा जर आपण आपल्याशीच अनोळखी राहू तर दुसऱ्याशी कसे रुबरु होऊ शकतो यार...त्याचेही सर्कल असेल ना
सोडा यार...आपण पहिले आपले होऊ मगच दुसऱ्याचे होऊ...
पचणारे नाहीत माझे विचार,मान्य
पण असेच विचार असेच माझे,भंपक अन समजण्या बाहेर...
सोडा
तर आपण आपल्याला समजावून घेऊ आधी मग सगळ्यांना पाहू
कारण स्वतःचे ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून हे नको आहे मला
तर आत्मसमृद्ध होऊ पहिले अन बघू दुसर्याकडे असे माझे भंपक विचार....
पण करू अंमल त्यावर...

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

मराठी ती भाषा

मजला माहीत नाही
की मराठी राजभाषा आहे की नाही
परंतु मी वापरतो 
ती माझ्या सर्व दिनक्रमात
अन त्याचा मला किंतूही अभिमान नाही
कारण तीच माझी भाषा आहे
अन तिचा अभिमान कसला
तर तीच माझी माय आहे
मायेचा अभिमान कसला
ती तर लेवणारी गोष्ट आहे
सदोदित
म्हणजे वापरातील गोष्ट ती
नाही की कधीतरी कौतुकासाठी,
कौतुक केले अन ठेवली ती बासनात
अन काढली फक्त ठराविक कारणासाठी
ती माझी बोलीभाषा आहे
नेहेमीच वापरतातली
एका दिवसासाचे कौतुक
होऊच शकत नाही
कारण ती कायम अंतापर्यंत
माझ्या
तीच माझे कौतुक अन तीच माझी बोली
जर तीच माझी तर का करू मी तिचे
उगी कौतुक
कौतुक करू पण ते परक्याचे
जे आज आहे उद्या नाही
माझी मराठी अनंत आहे
का करू मी कौतुक तिचे
जी माझ्या सवे कायम आहे.....

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

माझा सहकारी....रमाकांत सुरवसे....!!!😢

नाही रमाकांत,हे तुझं चुकलंच....
मान्य आहे रे की सगळेच एकदम जन्मतः कार्यक्षम नसतात,किंवा थोडी फार कमी असते रे सर्वांमध्ये...पण याचा अर्थ असा नाही की मनाला लावून अशी exit घ्यावी. असतात रे मर्यादा एखाद्याला,कमी जास्त प्रमाणात असतात गुण अवगुण...पण असे निघून जाणे...अरे यार..!
परवाच थोडी गरमागर्मी झाली,पण काल बोललो ना रे आपण हितगुज..... केली आपण चौकशी आपल्या कुटुंबाची....किती भर भरून सांगत होतास तू तुझ्याबद्दल,तुझ्या पोरांबद्दल....मग असा निष्ठुर का झालास? पोरांना पोरकं करून गेलास,ज्यांच्याबद्दल बोलतांना तुला किती अभिमान ,किती भरून आलेलं....
वाईट वाटत रे आम्ही तुझ्याबद्दल मजाक केले,हसलो पण त्याची इतकी भयंकर सजा देशील हे स्वप्नातही वाटलं नाही...
आज सकाळी ही आपण बोललो,बापरे...कल्पना ही अस्वस्थ करते की आपण आज बरोबर होतो अन हे भयंकर आक्रीत घडले....
सोपं आहे रे ,न सांगता गुपचूप निघून जाणं, पण यातना होतात रे अश्या गोष्टीने...
जग रहाटी आहे,जग चालूच राहील पण तुझ्यासारखा मृदू अन सहनशील सहकारी कायम स्मरणात राहील.....
परमेश्वर तुझ्या आत्म्यास सदगती देवो....😢