पृष्ठे

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

महाभारताचा नाही तर पुरोगामी भारताचा भीम....

नाही म्हणजे खर सांगायचं ठरलं तर ही एक जागतिक आश्चर्याची च घटना आहे.
तळा गाळातून कोणी एक जन्माला येतो काय अन कित्येक शेकडो हजारो लाखो वर्षांपासूनची किळसवाणी गुलामी उखडून टाकतो काय...सर्वच अकल्पनिय...!
त्याआधी पण बरेच जण आलेले,बऱ्याचदा सवर्ण च,पण त्यांनी असे करू नका तसे करू नका हाच वांझोटा उपदेश दिलेला....अपवाद छत्रपती शाहू महाराज...पण असा कोणी माईका लाल नव्हता की जो शड्डू ठोकून उभा राहिल या वर्षानुवर्षापासून चालत असलेल्या भिकार आणि केविलवाण्या समाजाविरोधात...
होय,मी केविलवानाच म्हटलोय.. कारण कोणीही जेव्हा एखाद्या सदोदित दाबून ठेवल्यावर अजून अत्याचार करतो ,झुंडशाहीने किंवा इतर मार्गाने म्हणजे हातात काही राखून ठेवायचे अन त्यावरून दडपायचे ह्याला मी केविलवाणे च म्हणणार किंवा दम असेल तर समोरासमोर लढा ना,का उगीच लपायचे त्या शिखंडीसारखे...
पण माझा भीम उभा राहिला अन नुसता उभाच नाही तर या प्रस्थापितांना आडवे केले ...
अहो विचार करा,तुम्ही चालताहेत अन तुमच्या पायाचे ठसे जमिनीवर उमटू नयेत म्हणून पाठी एक झाडू बांधलेला आहे..बापरे काय तो प्रकार अन मला त्या सडक्या मेंदूची कीव येतेय की असे विचार त्या कुजक्या मनात येऊ शकतात..म्हणजे तथाकथित प्रगत (प्रगत हा शब्द कौतुकाचा नाहीये,हातात हेतुपुरस्सर लेखणी राखून ठेवायची अन पुढच्याला त्यापासून दूर ठेऊन त्यालाच कमी लेखायचे असे हे पाखंडी प्रगत..) माकडांनी हा जो किळसवाणा खेल मांडला होता त्याला या भीमाने जे रामबाण उत्तर दिले त्या गोष्टीचा मी दिवाणा आहे.
म्हणजे पुढच्या काडीला तोडून छोटी न करता त्याने स्वतःच त्या भिकार काडीपेक्षा मोठे होऊन तिला खुजे ठरविले..त्याने दाखवून दिले ज्ञान म्हणजे कोण्या ऎर्या गैरयांची मक्तेदारी नाही,त्यावर हक्क आहे सर्वांचा...अन त्यातही कोणालाही त्यात उच्च होता येते त्यासाठी कोणतेही निर्बंध नाही..मला अजूनही विशेष वाटते,ज्या काळात हे विचार करणेही अवघड तिथे भीमाने करून दाखवले....बापरे खरंच अकल्पनिय...सगळेच स्वप्नातीत..
ह्या सूर्य जाळसमोर काजवे,रातकिडे पार जळून गेले,राख झाली त्यांची..
त्याने सिद्ध केले,बुद्धिमत्ता कुणाची मक्तेदारी नाही .ती एक कामधेनू आहे ,कुणीही जा,आपले कर्तृत्व सिद्ध करा आणि तिचा आस्वाद घ्या अन तीही नाही म्हणणार नाही...मुक्तपणे ती आपले ज्ञानरुपी दूध पाजेल त्याला...त्यासाठी उचचवर्णीय असावा असा निकष तिच्याकडे नाही...
यापूर्वी बरेच जणांनी मलम पट्टी केली परंतु ती स्वार्थासाठी असल्याने तिचे रूपांतर चळवळीत झाले नाही.पण भीमाने ज्योत पेटवली...तिचे रूपांतर एक वडवनलात केले...आपल्या सर्वांनी ती ज्योत पेटती ठेवली पाहिजे..ज्याप्रमाणे काही मंदिरांत पूर्वीपासून तेवत आलेल्या ज्योती जिवंत ठेवलेल्या आहेत...त्याला मी एक रूपक म्हणेन पण आपण त्यापेक्षा ही जिवंत,बुद्धिरूपी ज्योत कायम तेवत ठेवूया अन तीच खरी गोष्ट या भीमाला अभिप्रेत असेल...
करू जल्लोष,करू साजरा आनंद आपण उद्या,पण मनात ती ज्योत तेवत ठेवूया...अन तीच खरी आदरांजली ठरेल....
जय शिवराय जय भीम....