पृष्ठे

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रातली खडाजंगी...


झालं,संपलं एकदाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचं नाट्य...! आता उद्धव सरकारला चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो.
असो.या नाट्यमय घडामोडी ज्या घडल्या त्याने बऱ्याच गोष्टी समोर आल्या.त्याचाच या लेखात उहापोह.
यामध्ये मी सर्वात पहिले उल्लेख करिन देवेंद्र फडनवीसांचा..! अत्यंत अपरिपकव,कसलेही राजकीय गांभीर्य नाही.सर्व जणू माझ्याकरताच,अन मीच सर्वांच्या केंद्रस्थानी अशी उगीचच स्वतःबद्दल प्रौढी. एका रात्रीत , अन काहीही विचार न करता उतावीळ पणे गुडघ्याला बाशिंग बांधून फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढले. पुरते हसू करून घेतले.एवढा बालिश नेता महाराष्ट्राने कधी पहिला नसेल.अन राजीनामा दिल्यावर तर आव पाहायचं होता,गिरे भी तो मुंह उपर...!! सर्व काही नशिबाने भेटले होते,परंतु जणू स्वकर्तृत्वावर ते मिळवले अश्या अविर्भावात सहकारी गमावले,सत्ता गमावली अन महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात छि तू झालेला पहिला मुख्यमंत्री असावा.औट घटकेचा मुख्यमंत्री ! असो,विनोद बाजूला ठेऊ,परंतु अशी संधी हजारो वर्षात एकदाच येत असते,तिचे सोने करून घेणे फडनवीसांना जमले नाही ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांनी यातून बोध घ्यावा.
आता केंद्रातील नेतृत्वाबद्दल बोलू. मोदी अन शहा द्वायिंना तर महाराष्ट्रातल्या धोबी पछाड ने पुरते हलवले असेल.असा काही पलटवार भेटेल ही त्यांना कण भरही अपेक्षा नसेल.आणि त्यांना जो सत्तेचा मद होता,तो महाराष्ट्राने अक्षरशः ठेचून काढला.आपण जिथे जाऊ तिथे सरकार स्थापन करू अशी त्यांची धारणा.सोशल मीडिया वर तर भक्त गणांनी कहर केलेला,की शहा आता भारतात काय तर पाकिस्तान अन अमेरिकेतही सरकार स्थापन करू शकतात!! अन हे बहुतांशी खरेही होते कारण मेघालय,गोवा,कर्नाटक आणि बिहार या ठिकाणची त्याला पार्श्वभूमी होती.महाराष्ट्राने नुसती ही परंपरा मोडीत काढली नाही तर ,सर्वात जास्त मते असूनही त्यांना विरोधी पक्षात फेकले.यापेक्षा अजून काय अधोगती म्हणायची. महाराष्ट्राने बुड नसलेल्या पक्षाचे देश स्तरावर पुरते हसू केले, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.
आता त्यांचा 4 था हात,मीडिया लक्ष दुसरीकडे वेधते आहे.ज्या पद्धतीने bjp चे ते औट घटकेचे सरकार स्थापण झाले,त्यावेळी मीडिया चा जल्लोष अभूतपूर्व होता.आता तोंड लपवायची वेळ आली आहे त्यांच्यावर.
माझ्या मते आता देशात भाजप विरोध सुरू होईल अन त्यासाठी महाराष्ट्र फॅक्टर वापरला जाईल. भाजप च्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून चालू झाली आहे.
मि काही कोणत्या पक्षाचा असा नाही,हे मी पूर्वीच सांगितले आहे.जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचाराच्या सर्वोच्च पातळीवर होती त्यावेळी मी bjp ला मत देण्याचे आवाहन केले होते.कारण बदल पाहिजे.अन लोकशाहीतील सर्वात बलवान असा जो,मतदार किंवा जनता ,त्याला ती जाणीव पाहिजे की आपण ठरवले तर काहीही करू शकतो.जाब विचारला पाहिजे.परंतु हेही होईल,त्यासाठी वेळ लागेल. आता नवीन पिढी त्याबाबतीत जागरूक आहे.
मोदींविषयी आढि नाही परंतु त्यांचे जे वर्तन पाहता त्यांचीही अखेर देवेंद्र फडनविसंसारखीच होणार,हे आता तरी दिसत आहे.जनतेने विश्वासाने दुसरी टर्म दिली आहे,तिचा त्यांनी देशाच्या विकासासाठी वापर केला नाही तर त्यांनाही घरी बसावे लागेल. त्यांनी आता अंतर्गत कुटील आणि खुनशीचे राजकारण सोडून जरा भारतासमोर  आ वासून असलेल्या समस्यांचा विचार करावा.हम करे सो कायदा ही वृत्ती सोडून द्यावी.उगीच स्तुती पाठ कांच्या गराड्यात राहून उपयोग नाही.वेळ मोलाची आहे.खुप झाले आता देखावे,आता कामाला लागा,अन्यथा जनता कामाला लावेल.
अन सर्वात महत्वाचे म्हणजे मिजास सोडावी अन आपण आपणच म्हटल्या प्रमाणे प्रधान सेवक आहोत,त्याचे भान ठेवावे.
आता शरद पवारांबद्दल काय बोलावे.अक्खी बाजी पालटून टाकणारा वृद्ध योद्धा अशी इमेज तयार झाली.सर्वात महत्वाचे म्हणजे तरुणांपासून आबालवृद्धांनाही त्यांनी वेड लावले. अखिल भारतात त्यांचे नाव सध्या दुमदुमते आहे.वृत्तपत्र,सोशल मीडिया वर त्यांच्या बद्दल रकानेच्या रकाने भरून वाहत आहेत.भाजप विरोधात त्यांनी नवसंजीवणी दिली आहे बाकी पक्षांना. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी आणि शहा प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले होते त्यांना चांगलाच हाग्या दम दिला आहे.
या सगळ्या घडामोडीत उद्धव ठाकरेंचे नाव न घेणे चुकीचे ठरेल.त्यांनी अत्यंत पाय रोवून,पवार साहेबांवर विश्वास दाखवला.त्यांना साथ भेटली ती संजय राऊत साहेबांची.त्यांनी अशी काही भाजप विरोधी तुतारी फुंकली की भाजप चे धाबे दणाणले.त्यांना शेवटपर्यंत सुधरलेच नाही. उद्धव ठाकरे अत्यंत शांत अन धीराने वागले.त्याचे फळ त्यांना भेटलेच आहे.
असो,यात एक बाब प्रकर्षाने जाणवली की महाराष्ट्रातले वरिष्ठ पत्रकार या संपूर्ण घटना क्रमाकडे अत्यंत बारिकीने पहात होते.अन तयांचाही सूर किंवा ओढा म्हणा भाजप विरोधी च होता.अन तो रास्तच होता.भाजप ची मग्रुरी ठेचून काढलीच पाहिजे हा समस्त मराठी माणसाचा एकंदर कल होता.यावेळी सोशल मीडिया वर अभूतपूर्व असे एकसे एक व्यंग येत होते. सगळी जनता या संग्रामकडे पहात होती.
याला अजित दादांनी थोडी कलाटणी दिली,तेव्हा बहुसंख्य मराठी माणूस दुखावला होता पण ते क्षणिक होते,शेवट गोड व्हायचा होता.
असो,आता ह्या उद्धव सरकार पुढे खूप आव्हाने आहेत,परंतु मागील लेखात म्हटल्याप्रमाणे जर अशीच श्रद्धा पवार साहेबांवर कायम ठेवली तर ती आव्हानेही चुटकी सरशी नाहीशी होतील.
आणि हो,जाता जाता ह्या सरकारनेही जर निराशा केली ,काही बालिश पणा केला तर जनता त्यांनाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
जय महाराष्ट्र...
विवेक पगारे....

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्राचा धोबीपछाड...

महाराष्ट्राची सध्य राजकीय परिस्थिती पाहता जे काय चालू आहे ते उचितच आहे म्हणावे लागेल.
ज्याप्रमाणे पाखंडी भाजप सरकारचा जो मस्तवाल पणा होता तो मराठी जनतेने पुरता चेचून काढला आहे.आता जनता शिवसेनेकडे अन पर्यायाने पवार साहेबांकडे आशेने डोळे लावून बसली आहे.काहीही करो,म्हणजे साम दाम दंड भेद , परंतु ही भाजपा नको. कारण इतिहास पाहतांना अस लक्षात येईल की भाजपने आपल्या सोयीनुसार राजकारण केले.मित्रांना तर अगदी लाचार करून त्यांना फरफटायला भाग पाडले.अक्षरशः शिवसेनेची तर केविलवाणी अवस्था केली होती.
मी काही शिवसेनेचा चाहता नाही ,परंतु शिवसेनेचा जो अपमान होत होता तो माझ्या मराठी मनाला कुठंतरी सलत होता,अन हे मत बहुदा अख्ख्या मराठी जनतेचे असू शकेल.ही दांभिक भाजप पार्टी ,महाजनादेश म्हणून कुंथते तो काय त्यांचा मक्ता नव्हताच काही.शिवसेनेसहित त्यांना दिलेला कौल होता.अन तेच नेमके ते सोयीस्कर रित्या विसरतात.
खरं तर त्या दुतोंडी पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे की उलट हा महाजनादेश नाही तर त्यांची लायकी महाराष्ट्राने दाखवलेला आदेश आहे.किती मूळ चे भाजप आहेत हो निवडून आलेले?
त्यात उलट जे प्रस्थापित होते त्यांना जनतेने धोबीपछाड दिला आहे,ही अजून अपमानित स्थिती.परंतु या निलाजऱ्या पक्षाला तो विचार नको आहे,फक्त एकच हेका की शिवसेनेने आम्हाला धोका दिला.
मलांतर या भाजप वाल्यांची कीव येते.अन कोण यांचे मंत्री.एकटे फडणवीस सोडले तर निवडून आलेले सगळे दुय्यम.म्हणजे फडणवीस काही प्रथम नाहीच परंतु मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात म्हणून ते प्रथम,नाहीतर काय यांचे कर्तृत्व? पूर्ण काळ सगळी परिस्थिती आपल्या च हातात म्हणून मुजोरीने वागले.काहीही पार्श्वभूमी (म्हणजे राजकारणाची,इतरांच्या तुलनेने),काहीही आगपिच्छा नसतांना फक्त हायकमांडचे बाहुले म्हणून गुळाचा गणपती.परंतु मस्ती इतकी की मीच स्वयंभू असे बेताल वागणे.पण हा मस्तवाल पणा अन सत्तेची नशा मराठी जनतेने खाडकन उतरवला अन जमिनीवर नाही तर जमिनीखालीच घातले.
बाकीच्यांचे तर सोडाच.सगळेच विदूषक.काहीही धोरण नाही,काहीही विचार नाहीत फक्त पुण्याई. पण महाराज ही पुण्याई दरवेळी कामाला येत नाही,तिथं कर्तुत्वच पाहिजे अन नुसते कर्तृत्व ही नाही नम्रता आणि गांभीर्य ही हवे जोडीला नाहीतर होतो फडणवीस !
हाय कमांड महाराष्ट्रात यायला तयार नाही,कारण हिम्मत नाही.महाराष्ट्र म्हणजे इतरांसारखा नाही,तुम्ही काहीही माजूरडे पणा कराल अन तो साथ देईल. भल्याभल्यांची अवस्था त्याने निकाली लावली,अन हे पूर्वीपासून आहे.मराठी जनता सोशिक आहे,खूप आहे परन्तु भंपक नाही.तुमचा घडा भरला की व्यवस्थित तुंमची लायकी दाखवते.या गुणाला आता माझ्या मते फडणवीस प्रयोग म्हणायला हरकत नसावी.असो.विनोद बाजूला ठेऊन जर त्रयस्थ म्हणून पाहिले या प्रसंगकडे तर एक गोष्ट लक्षात येईल,जनतेने कोणालाही बहुमत दिलेले नाही परंतु योग्य तो संदेश दिला आहे.पूर्वापासून महाराष्ट्राची जी इमेज देशाच्या राजकारणात ,घडामोडीत आहे तीच परंपरा या निकालाने कायम ठेवली आहे.म्हणजे तुम्ही कितीही बाहेर आलमगीर असा की ब्रिटिश असा ,आमच्या राज्यात खरे असले तरच किंमत नाहीतर पायदळी.
असो.आता शिवसेनेने समंजस पाने वागून म्हणजे बालिश पणा न करता साहेबांच्या विचाराने वागावे.आता शिवसेना वागणारच तशी कारण पोळलेली आहे,अपमानास्पद वागणुकीने भडकलेली आहे,संजय रौतांसारखं हुशार अन अस्मिता दुखावलेला माणूस आहे.मला विश्वास आहे की शिवसेना आता संधी सोडणार नाही.
बाकी पाठिंब्याचे साहेबांवर सोडा.ते सिद्ध राजकारणी आहेत.कोणतीही गाठ ते अलगद सोडवतील.
मी पुन्हा एकदा मराठी जनतेचे अभिनंदन करतो की आपली परंपरा अबाधित राखली अन आपण काय चीज आहे ते सगळ्या देशाला दाखवले.म्हणजे जो बिनकामाचा गंड तयार झाला होता की या पाखंडी अन बोल घेवड्या पक्षाचा अश्वमेध कोणीही रोखू शकत नाही,तो नुसताच महाराष्ट्राने रोखला नाहीतर त्याची मस्ती ठेचून काढली.
विवेक पगारे