पृष्ठे

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

कूप मंदुकांचा खेळ.....!!!!!


वाघ्या कुत्र्याची समाधी उध्वस्त केल्यानंतर ,श्रीयुत संजय सोनावानींनी उपोषण केले होते  त्यावर आलेल्या असंख्य प्रतिसादांना दिलेले उत्तर .......



तीच तीच भंपक चर्चा ..!! जग कुठे चाललेय आणि आपण गुवातच लोळतोय..!!अरे मित्रांनो या जुन्या गोष्टींचे दळण दळतांना एवढे लक्षात ठेवा कि पूर्वीपासून जे जे काही घडत होते त्याला त्यावेळचे संदर्भ , भौगोलिक परिस्थिती , सामाजिक परिस्थिती असे अनेक पैलू होते.त्यानुसार त्यावेळचे जीवन होते. ते त्या ठिकाणी बरोबरच होते किंवा त्याबाबतीत आपण आत्ता काहीही अनुमान काढू शकत नाही.(  म्हणजे बरोबर किंवा चूक...?)
आपला मूर्खपणा हा आहेकी आपण आत्ता या घडीला पुराणातल्या वान्ग्यांवरून आपलीच एकमेकांची चड्डी ओढतो आहोत. अरे मी म्हणतो शिवाजी महाराजांचा वाघ्या  कुत्रा असेल किंवा नसेल,भट ब्राम्हणांनी त्यावेळी नंगा नाच घातला असेल , ब्राम्हणेतर जातींची त्यावेळी प्रचंड कुचंबना असेल सगळे ठीक आहे....परंतु या गोष्टींमध्येच रममाण होऊन आपण आपले वर्तमान विसरतो आहोत.आता तर तसे वातावरण नाहीना , मग दाखवा कि आपल्या xxxxx तला जोर..! उपद्रवी काम तर कोणीही करेल त्याला डोक्याची आवश्यकता नाही परंतु विधायक कामाला दम लागतो.आता तर कुणाची मक्तेदारी नाही मग का इतिहासाच्या कुबड्या घ्यायच्या? इतिहासाचाही सहारा लागेल परंतु कश्यासाठी तर प्रतिकूल परिस्थितीत टाळके कसे वापरावे यासाठी..!!कोण कुठला काल्पनिक शेरलोक होम्स , त्याच्या स्मृती त्या ब्रिटिशांनी कश्या जपून ठेवल्या ते पहा.आपण आपल्याच इतिहासाची वासलात आपल्या हातांनी लावायला चाललो आहोत.मी म्हणतो नव्हता न वाघ्या कुत्रा ,तर त्याच्या समाधीच्या बाजूला एका फलकावर व्यवस्थित संदर्भांसहित लिहून ठेवा ना कि ते कसे चुकीचे आहे .कोण तुम्हाला अडवेल.परंतु उठसुठ विखारी भाषा वापरून ,आड दांड पणा करून असे वागणे चुकीचे आहे त्यामुळे समाजात चुकीचाच संदेश जाणार , हशील तर काही होणार नाही.
महाराजांच्या समाधीच्या बांधकामाच्या वेळीच जर वाघ्याची समाधी बांधली असेल तर ती माझ्या मते ऐतिहासिकच...!!तिची तोडफोड करण्यापेक्षा मी वर सांगितलेला उपाय केला तर जेव्हढे रायगडला भेट देतात त्यांच्या वाचनात तरी हि गोष्ट येईल .
जाता जाता शेवटी , मला तर इतिहासाचा महाराज आणि शंभूराजे  एक सोडले तर कुणाशीही घेणे नाही.आणि मला सन सनावळ्या ,महत्वाच्या नसलेल्या भंपक गोष्टी कि ज्यावरून बिनकामाचा गदारोळ होईल अश्या ,आणि वरील दोघांव्यतिरिक्त कोणीही दुसरा
यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.परंतु याचा अर्थ असा नाही कि मी त्यांच्यावर गरळ ओकत बसेन..!कोणत्या क्षणी महाराज कसे वागले आणि का वागले आणि त्यातून काय बोध घ्यायचा एव्हढेच माझ्या लेखी महत्वाचे.त्यांच्या चरित्रातून जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर बोध घेता येईल ,त्यांचे विचार आणि आचार अंगिकारले तर या भंपक गोष्टींची कीवच येईल कारण त्यांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा कदापीही नव्हताच .उलट महाराजानंतर आणि शाम्भूराजानंतर आपण जी त्यांच्या अभिप्रेत  असणार्या गोष्टींची जी काही वाट लावली आहे कि आपल्या शत्रुंनीही ती तेव्हढी केली नसेल ! महाराज जर वरून पाहत असतील तर हाच का तो आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र असा यक्ष प्रश्न त्यांना पडला असेल.
आणि हो एव्हढा पत्र प्रपंच ह करायचे कारणही नव्हते , आणि मला तर याविषयी बोलायचेही नव्हते परंतु हा चाललेला पोरखेळ पाहून मला माझीच लाज वाटली .संजय सोनावानींचे मी अभिनंदन करेन कारण त्यानाही अभिप्रेत सर्व धर्म समभाव आहे ,उगीचच कारण नसतांना डोक्यात राख घालून घ्यायची नाहीये .त्यांना खरा शिव धर्म कळलेला आहे.आणि हा डबक्यात चालणारा गलिच्छ खेळ करून आपणच आपल्या अंगावर शिंतोडे उडवून घेत आहोत.

जय शिवराय....!!!!

06-08-2012