पृष्ठे

गुरुवार, ५ मे, २०११

थोडेसे सेनाप्रमुखांबद्दल !!


आज सकाळ मध्ये सेनाप्रमुखांचा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यामंत्र्यांबद्दल लेख वाचला.लेख वाचतांना जे हसू आले ते अजूनही ओसरले नाही. " एवढा बिन डोक मुख्यमंत्री महाराष्ट्राने अजून पहिला नाही !" इतके समर्पक वर्णन एखाद्या नेत्याबद्दल फक्त सेनाप्रमुखच प्रभुत्वाने करू शकतात.जरा राजकारण बाजूला ठेऊया .सेनाप्रमुखांसारखा माणूस होणे नाही ,हे त्रिवार सत्य आहे. ते अजून १० वर्षांनी तरुण हवे होते !त्यांचे जळजळीत अग्रलेख ,आणि सरळ ,मनातून आलेली ठाकरी भाषा तडक हृदयालाच हात घालते.त्यांचा मार्मिक मधला एक लेख आठवतो ,एका मंत्र्याबद्दल त्यांनी सांगितले होते ( तो काँग्रेस चा होता हे सांगायला नकोच ,परंतु त्याचे नाव आठवत नाही असो ) ' पुराणात लपट शंख म्हणून एक निष्फळ शंख सांगितला आहे ,XXXXX नेता हा राजकारणातला लपट शंख आहे ' .या लेखापासून मी या माणसाचा चाहता झालो.आजच्या मुख्यामंत्र्यांबद्दल चा उल्लेख वाचून तर मला लोकमान्यांची आठवण आली. बेताल नारोबा ,पिचका बांबू ( मधुकर पिचड ) ,मैद्याच पोत ( शरद पवार ), लखोबा लोखंडे ( भुजबळ ) ,वाकड्या तोंडाचा गांधी ( अण्णा) ,बेडूक उड्या वाला कलमाडी इ. खरे तर त्यांची जागा घेणारा कोणी नाही. उद्धव कडून तर काहीच अपेक्षा नाही , राज कडून होत्या तर त्याने वेगळी चूल मांडून ठेवली आहे. मुंबई मध्ये मराठी माणसाचा धाक तसेच काँग्रेस आणि परप्रांतीयांवर सुद्धा जरब युक्त दरारा हा सर्व त्यांचा करिष्मा आहे.शिवाय त्यांचे स्वतःचे मंत्री सुद्धा त्यांना जाम टरकून असतात.राजकारण एवढा विषय तूर्त बाजूस ठेवल्यास " सर्वच मराठी जणांच्या हृदयाच्या सिंहासनावर चा अनभिषिक्त सम्राट " असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

"अमेरिकेची दादागिरी "


आणि अखेर या विश्वातल्या सर्वात ताकदवान राष्ट्राने त्या लादेनला ठार करून अपमानाचा बदला घेतलाच ! पण त्यासाठी या सामर्थ्यशाली देशाला १० वर्षे वाट पहावी लागली ,करोडो रुपये खर्च करावे लागले .जोपर्यंत लादेन सापडत नव्हता तोपर्यंत थयठयात चालू होता.अक्षरशः लाजिरवाणी स्थिती होती.एव्हढे बलशाली राष्ट्र , त्याला कोण हा लादेन १० वर्षे गुंगारा देत होता.एक मात्र मान्य करावे लागेल कि लादेन ने त्यांची मग्रुरी चांगलीच ठेचून काढली.शेवटी फक्त आणि फक्त झुंड शाहीच्या जोरावर त्यांनी घरात घुसून लादेनला कंठस्नान घातले. आता अमेरिकेने सुटकेचा निश्वास टाकला असेल. परंतु आता त्यांच्या पुढचे आव्हान वाढले आहे.अल कायदा त्याच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.असो.
परंतु विषय हा आहे कि असा अमेरिकेला अधिकार कोणी दिला कि कुणाच्याही घरात घुसण्याचा?मी तर म्हणेन लादेन खरे तर चांगलाच! त्याने या सामर्थ्यवान राष्ट्राला आव्हान दिले होते.( म्हणजे त्याच्या निरपराध लोकांना लक्ष्य करणे हे कधीही वाईटच ) परंतु हि अमेरिका जेव्हा स्वतःच्या दादागीरीसाठी इराक,लिबिया यावर हल्ले करते तेव्हा हि निरपराध माणसे मरतातच ना? त्यावेळी या अमेरिकेला का कळवळा यात नाही?म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी दरवेळी भूमिका बदलवणारी हि पाखंडी अमेरिका सर्व वादाचे मूळ आहे.
या लादेन बद्दल मला काही आत्मीयता नाही परंतु जर स्वाभिमान ,प्रखर राष्ट्राभिमान आणि स्वतःच्या धर्माविषयी असणारी निष्ठा मागायची ठरली तर भगवंताकडे मी या गोष्टी लादेन सारख्याच मागेन !!!

"महाराज -एक वैश्विक व्यक्तिमत्व "

" राजा शिवछात्रपती " या अत्यंत यशस्वी मालिके नंतर श्री.नितीन चंद्रकात देसाई यांनी महाराजांवर एक आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट करायची घोषणा केली आहे. त्यासाठी मज सारख्या क्शुद्राने त्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत.त्या त्यांना मेल हि केलेल्या आहेत.   माहितीसाठी देत आहे.
नितीन देसाई साहेब आपली महाराजांवर चित्रपट करावयाची इच्छा पाहून खरेच धन्य झालो. या गोष्टीची मला खूप वर्षांपासून प्रतीक्षा होती. कारण महाराजांचे चरित्र अक्क्ख्या जगापुढे येणे हि काळाची गरज होती .
या चित्रपटासाठी म्या पामराच्या काही सूचना ( ? ) आहेत , जर त्या ठायी असल्या तर त्यावर विचार व्हावा.
१.चित्रपटाचे नाव"ग्रेट वारीअर राजा शिवछात्रपती" असे असण्याऐवजी " ग्रेट वारीअर राजा शिवाजी " असे ठेवणे इष्ट ठरेल . शिवाजी हे नाव वैश्विक वाटते.
२.इंग्लिश चित्रपट "३००" हा आपण जर पहिला असेल तर त्यातील तंत्रज्ञान, अनिमेशन यात वापरावे , त्यामुळे आपला सह्याद्री अगदी समर्पक रित्या सर्व जगाला माहित होईल.
३.चित्रपटासाठी बजेट चा विचार करू नये म्हणजे एखाद्या प्रसंगासाठी जर प्रचंड पैसा लागणार असेल तर तो लागू द्यावा म्हणजे गुणवत्तेसाठी हातमिळवणी होणार नाही. (पैसा उभारण्यासाठी जर महाराष्ट्रातील जनतेला आवाज दिला तर आपण खूप मोठी रक्कम उभी करू शकू. )
४. खरे तर शिवचरित्रातील एकेक गोष्ट म्हणजे एक अक्खा पिक्चर आहे. त्यामुळे पैसा, वेळ निर्बंध न मानता काम करावे.
५.चित्रपटाचे शुटींग शक्य तोवर गड-किल्ल्यांवरच करावे जेणेकरून महारास्त्रातल्या या धारातीर्थांबद्दल सर्वांनाच कुतुहूल निर्माण होईल.
६.लढाया, युद्धाचे जिवंत चित्रण करावे. ( प्रसंगी होलीवूद्चे साहाय्य घ्यावे,यात कंजुषी नको, कारण ती बलस्थाने असतील. )कारण आतापर्यंत जे काही युद्धाचे चित्रण भारतीय चित्रपटात झालेले आहे ते अत्यंत बालिश आणि अतिशय लाज काढण्यासारखे झालेले आहे.
अश्या या शिवधानुश्यास पेलण्यास आपण सर्वस्वी समर्थ आहात. आई भवानी आपल्या या पवित्र कार्यास आपणास येश देईलच यात आम्हास कणभरही किंतु नाही.आम्हास चातकाप्रमाणे प्रतीक्षा आहे." जय भवानी जय शिवाजी "
ता.क. या पवित्र कार्यात जर आम्हास मृत मावळ्याची जरी भूमिका दिली तर आमचे जीवन धन्य होईल.

Top rated blogs - मराठी World

Top rated blogs - मराठी World