पृष्ठे

गुरुवार, ५ मे, २०११

थोडेसे सेनाप्रमुखांबद्दल !!


आज सकाळ मध्ये सेनाप्रमुखांचा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यामंत्र्यांबद्दल लेख वाचला.लेख वाचतांना जे हसू आले ते अजूनही ओसरले नाही. " एवढा बिन डोक मुख्यमंत्री महाराष्ट्राने अजून पहिला नाही !" इतके समर्पक वर्णन एखाद्या नेत्याबद्दल फक्त सेनाप्रमुखच प्रभुत्वाने करू शकतात.जरा राजकारण बाजूला ठेऊया .सेनाप्रमुखांसारखा माणूस होणे नाही ,हे त्रिवार सत्य आहे. ते अजून १० वर्षांनी तरुण हवे होते !त्यांचे जळजळीत अग्रलेख ,आणि सरळ ,मनातून आलेली ठाकरी भाषा तडक हृदयालाच हात घालते.त्यांचा मार्मिक मधला एक लेख आठवतो ,एका मंत्र्याबद्दल त्यांनी सांगितले होते ( तो काँग्रेस चा होता हे सांगायला नकोच ,परंतु त्याचे नाव आठवत नाही असो ) ' पुराणात लपट शंख म्हणून एक निष्फळ शंख सांगितला आहे ,XXXXX नेता हा राजकारणातला लपट शंख आहे ' .या लेखापासून मी या माणसाचा चाहता झालो.आजच्या मुख्यामंत्र्यांबद्दल चा उल्लेख वाचून तर मला लोकमान्यांची आठवण आली. बेताल नारोबा ,पिचका बांबू ( मधुकर पिचड ) ,मैद्याच पोत ( शरद पवार ), लखोबा लोखंडे ( भुजबळ ) ,वाकड्या तोंडाचा गांधी ( अण्णा) ,बेडूक उड्या वाला कलमाडी इ. खरे तर त्यांची जागा घेणारा कोणी नाही. उद्धव कडून तर काहीच अपेक्षा नाही , राज कडून होत्या तर त्याने वेगळी चूल मांडून ठेवली आहे. मुंबई मध्ये मराठी माणसाचा धाक तसेच काँग्रेस आणि परप्रांतीयांवर सुद्धा जरब युक्त दरारा हा सर्व त्यांचा करिष्मा आहे.शिवाय त्यांचे स्वतःचे मंत्री सुद्धा त्यांना जाम टरकून असतात.राजकारण एवढा विषय तूर्त बाजूस ठेवल्यास " सर्वच मराठी जणांच्या हृदयाच्या सिंहासनावर चा अनभिषिक्त सम्राट " असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा