" राजा शिवछात्रपती " या अत्यंत यशस्वी मालिके नंतर श्री.नितीन चंद्रकात देसाई यांनी महाराजांवर एक आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट करायची घोषणा केली आहे. त्यासाठी मज सारख्या क्शुद्राने त्यांना काही गोष्टी सुचविल्या आहेत.त्या त्यांना मेल हि केलेल्या आहेत. माहितीसाठी देत आहे.
नितीन देसाई साहेब आपली महाराजांवर चित्रपट करावयाची इच्छा पाहून खरेच धन्य झालो. या गोष्टीची मला खूप वर्षांपासून प्रतीक्षा होती. कारण महाराजांचे चरित्र अक्क्ख्या जगापुढे येणे हि काळाची गरज होती .
या चित्रपटासाठी म्या पामराच्या काही सूचना ( ? ) आहेत , जर त्या ठायी असल्या तर त्यावर विचार व्हावा.
१.चित्रपटाचे नाव"ग्रेट वारीअर राजा शिवछात्रपती" असे असण्याऐवजी " ग्रेट वारीअर राजा शिवाजी " असे ठेवणे इष्ट ठरेल . शिवाजी हे नाव वैश्विक वाटते.
२.इंग्लिश चित्रपट "३००" हा आपण जर पहिला असेल तर त्यातील तंत्रज्ञान, अनिमेशन यात वापरावे , त्यामुळे आपला सह्याद्री अगदी समर्पक रित्या सर्व जगाला माहित होईल.
३.चित्रपटासाठी बजेट चा विचार करू नये म्हणजे एखाद्या प्रसंगासाठी जर प्रचंड पैसा लागणार असेल तर तो लागू द्यावा म्हणजे गुणवत्तेसाठी हातमिळवणी होणार नाही. (पैसा उभारण्यासाठी जर महाराष्ट्रातील जनतेला आवाज दिला तर आपण खूप मोठी रक्कम उभी करू शकू. )
४. खरे तर शिवचरित्रातील एकेक गोष्ट म्हणजे एक अक्खा पिक्चर आहे. त्यामुळे पैसा, वेळ निर्बंध न मानता काम करावे.
५.चित्रपटाचे शुटींग शक्य तोवर गड-किल्ल्यांवरच करावे जेणेकरून महारास्त्रातल्या या धारातीर्थांबद्दल सर्वांनाच कुतुहूल निर्माण होईल.
६.लढाया, युद्धाचे जिवंत चित्रण करावे. ( प्रसंगी होलीवूद्चे साहाय्य घ्यावे,यात कंजुषी नको, कारण ती बलस्थाने असतील. )कारण आतापर्यंत जे काही युद्धाचे चित्रण भारतीय चित्रपटात झालेले आहे ते अत्यंत बालिश आणि अतिशय लाज काढण्यासारखे झालेले आहे.
अश्या या शिवधानुश्यास पेलण्यास आपण सर्वस्वी समर्थ आहात. आई भवानी आपल्या या पवित्र कार्यास आपणास येश देईलच यात आम्हास कणभरही किंतु नाही.आम्हास चातकाप्रमाणे प्रतीक्षा आहे." जय भवानी जय शिवाजी "
ता.क. या पवित्र कार्यात जर आम्हास मृत मावळ्याची जरी भूमिका दिली तर आमचे जीवन धन्य होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा