झालं,संपलं एकदाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचं नाट्य...! आता उद्धव सरकारला चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो.
असो.या नाट्यमय घडामोडी ज्या घडल्या त्याने बऱ्याच गोष्टी समोर आल्या.त्याचाच या लेखात उहापोह.
यामध्ये मी सर्वात पहिले उल्लेख करिन देवेंद्र फडनवीसांचा..! अत्यंत अपरिपकव,कसलेही राजकीय गांभीर्य नाही.सर्व जणू माझ्याकरताच,अन मीच सर्वांच्या केंद्रस्थानी अशी उगीचच स्वतःबद्दल प्रौढी. एका रात्रीत , अन काहीही विचार न करता उतावीळ पणे गुडघ्याला बाशिंग बांधून फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या बोहल्यावर चढले. पुरते हसू करून घेतले.एवढा बालिश नेता महाराष्ट्राने कधी पहिला नसेल.अन राजीनामा दिल्यावर तर आव पाहायचं होता,गिरे भी तो मुंह उपर...!! सर्व काही नशिबाने भेटले होते,परंतु जणू स्वकर्तृत्वावर ते मिळवले अश्या अविर्भावात सहकारी गमावले,सत्ता गमावली अन महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात छि तू झालेला पहिला मुख्यमंत्री असावा.औट घटकेचा मुख्यमंत्री ! असो,विनोद बाजूला ठेऊ,परंतु अशी संधी हजारो वर्षात एकदाच येत असते,तिचे सोने करून घेणे फडनवीसांना जमले नाही ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांनी यातून बोध घ्यावा.
आता केंद्रातील नेतृत्वाबद्दल बोलू. मोदी अन शहा द्वायिंना तर महाराष्ट्रातल्या धोबी पछाड ने पुरते हलवले असेल.असा काही पलटवार भेटेल ही त्यांना कण भरही अपेक्षा नसेल.आणि त्यांना जो सत्तेचा मद होता,तो महाराष्ट्राने अक्षरशः ठेचून काढला.आपण जिथे जाऊ तिथे सरकार स्थापन करू अशी त्यांची धारणा.सोशल मीडिया वर तर भक्त गणांनी कहर केलेला,की शहा आता भारतात काय तर पाकिस्तान अन अमेरिकेतही सरकार स्थापन करू शकतात!! अन हे बहुतांशी खरेही होते कारण मेघालय,गोवा,कर्नाटक आणि बिहार या ठिकाणची त्याला पार्श्वभूमी होती.महाराष्ट्राने नुसती ही परंपरा मोडीत काढली नाही तर ,सर्वात जास्त मते असूनही त्यांना विरोधी पक्षात फेकले.यापेक्षा अजून काय अधोगती म्हणायची. महाराष्ट्राने बुड नसलेल्या पक्षाचे देश स्तरावर पुरते हसू केले, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.
आता त्यांचा 4 था हात,मीडिया लक्ष दुसरीकडे वेधते आहे.ज्या पद्धतीने bjp चे ते औट घटकेचे सरकार स्थापण झाले,त्यावेळी मीडिया चा जल्लोष अभूतपूर्व होता.आता तोंड लपवायची वेळ आली आहे त्यांच्यावर.
माझ्या मते आता देशात भाजप विरोध सुरू होईल अन त्यासाठी महाराष्ट्र फॅक्टर वापरला जाईल. भाजप च्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून चालू झाली आहे.
मि काही कोणत्या पक्षाचा असा नाही,हे मी पूर्वीच सांगितले आहे.जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचाराच्या सर्वोच्च पातळीवर होती त्यावेळी मी bjp ला मत देण्याचे आवाहन केले होते.कारण बदल पाहिजे.अन लोकशाहीतील सर्वात बलवान असा जो,मतदार किंवा जनता ,त्याला ती जाणीव पाहिजे की आपण ठरवले तर काहीही करू शकतो.जाब विचारला पाहिजे.परंतु हेही होईल,त्यासाठी वेळ लागेल. आता नवीन पिढी त्याबाबतीत जागरूक आहे.
मोदींविषयी आढि नाही परंतु त्यांचे जे वर्तन पाहता त्यांचीही अखेर देवेंद्र फडनविसंसारखीच होणार,हे आता तरी दिसत आहे.जनतेने विश्वासाने दुसरी टर्म दिली आहे,तिचा त्यांनी देशाच्या विकासासाठी वापर केला नाही तर त्यांनाही घरी बसावे लागेल. त्यांनी आता अंतर्गत कुटील आणि खुनशीचे राजकारण सोडून जरा भारतासमोर आ वासून असलेल्या समस्यांचा विचार करावा.हम करे सो कायदा ही वृत्ती सोडून द्यावी.उगीच स्तुती पाठ कांच्या गराड्यात राहून उपयोग नाही.वेळ मोलाची आहे.खुप झाले आता देखावे,आता कामाला लागा,अन्यथा जनता कामाला लावेल.
अन सर्वात महत्वाचे म्हणजे मिजास सोडावी अन आपण आपणच म्हटल्या प्रमाणे प्रधान सेवक आहोत,त्याचे भान ठेवावे.
आता शरद पवारांबद्दल काय बोलावे.अक्खी बाजी पालटून टाकणारा वृद्ध योद्धा अशी इमेज तयार झाली.सर्वात महत्वाचे म्हणजे तरुणांपासून आबालवृद्धांनाही त्यांनी वेड लावले. अखिल भारतात त्यांचे नाव सध्या दुमदुमते आहे.वृत्तपत्र,सोशल मीडिया वर त्यांच्या बद्दल रकानेच्या रकाने भरून वाहत आहेत.भाजप विरोधात त्यांनी नवसंजीवणी दिली आहे बाकी पक्षांना. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी आणि शहा प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले होते त्यांना चांगलाच हाग्या दम दिला आहे.
या सगळ्या घडामोडीत उद्धव ठाकरेंचे नाव न घेणे चुकीचे ठरेल.त्यांनी अत्यंत पाय रोवून,पवार साहेबांवर विश्वास दाखवला.त्यांना साथ भेटली ती संजय राऊत साहेबांची.त्यांनी अशी काही भाजप विरोधी तुतारी फुंकली की भाजप चे धाबे दणाणले.त्यांना शेवटपर्यंत सुधरलेच नाही. उद्धव ठाकरे अत्यंत शांत अन धीराने वागले.त्याचे फळ त्यांना भेटलेच आहे.
असो,यात एक बाब प्रकर्षाने जाणवली की महाराष्ट्रातले वरिष्ठ पत्रकार या संपूर्ण घटना क्रमाकडे अत्यंत बारिकीने पहात होते.अन तयांचाही सूर किंवा ओढा म्हणा भाजप विरोधी च होता.अन तो रास्तच होता.भाजप ची मग्रुरी ठेचून काढलीच पाहिजे हा समस्त मराठी माणसाचा एकंदर कल होता.यावेळी सोशल मीडिया वर अभूतपूर्व असे एकसे एक व्यंग येत होते. सगळी जनता या संग्रामकडे पहात होती.
याला अजित दादांनी थोडी कलाटणी दिली,तेव्हा बहुसंख्य मराठी माणूस दुखावला होता पण ते क्षणिक होते,शेवट गोड व्हायचा होता.
असो,आता ह्या उद्धव सरकार पुढे खूप आव्हाने आहेत,परंतु मागील लेखात म्हटल्याप्रमाणे जर अशीच श्रद्धा पवार साहेबांवर कायम ठेवली तर ती आव्हानेही चुटकी सरशी नाहीशी होतील.
आणि हो,जाता जाता ह्या सरकारनेही जर निराशा केली ,काही बालिश पणा केला तर जनता त्यांनाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
जय महाराष्ट्र...
विवेक पगारे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा