महाराष्ट्राची सध्य राजकीय परिस्थिती पाहता जे काय चालू आहे ते उचितच आहे म्हणावे लागेल.
ज्याप्रमाणे पाखंडी भाजप सरकारचा जो मस्तवाल पणा होता तो मराठी जनतेने पुरता चेचून काढला आहे.आता जनता शिवसेनेकडे अन पर्यायाने पवार साहेबांकडे आशेने डोळे लावून बसली आहे.काहीही करो,म्हणजे साम दाम दंड भेद , परंतु ही भाजपा नको. कारण इतिहास पाहतांना अस लक्षात येईल की भाजपने आपल्या सोयीनुसार राजकारण केले.मित्रांना तर अगदी लाचार करून त्यांना फरफटायला भाग पाडले.अक्षरशः शिवसेनेची तर केविलवाणी अवस्था केली होती.
मी काही शिवसेनेचा चाहता नाही ,परंतु शिवसेनेचा जो अपमान होत होता तो माझ्या मराठी मनाला कुठंतरी सलत होता,अन हे मत बहुदा अख्ख्या मराठी जनतेचे असू शकेल.ही दांभिक भाजप पार्टी ,महाजनादेश म्हणून कुंथते तो काय त्यांचा मक्ता नव्हताच काही.शिवसेनेसहित त्यांना दिलेला कौल होता.अन तेच नेमके ते सोयीस्कर रित्या विसरतात.
खरं तर त्या दुतोंडी पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे की उलट हा महाजनादेश नाही तर त्यांची लायकी महाराष्ट्राने दाखवलेला आदेश आहे.किती मूळ चे भाजप आहेत हो निवडून आलेले?
त्यात उलट जे प्रस्थापित होते त्यांना जनतेने धोबीपछाड दिला आहे,ही अजून अपमानित स्थिती.परंतु या निलाजऱ्या पक्षाला तो विचार नको आहे,फक्त एकच हेका की शिवसेनेने आम्हाला धोका दिला.
मलांतर या भाजप वाल्यांची कीव येते.अन कोण यांचे मंत्री.एकटे फडणवीस सोडले तर निवडून आलेले सगळे दुय्यम.म्हणजे फडणवीस काही प्रथम नाहीच परंतु मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात म्हणून ते प्रथम,नाहीतर काय यांचे कर्तृत्व? पूर्ण काळ सगळी परिस्थिती आपल्या च हातात म्हणून मुजोरीने वागले.काहीही पार्श्वभूमी (म्हणजे राजकारणाची,इतरांच्या तुलनेने),काहीही आगपिच्छा नसतांना फक्त हायकमांडचे बाहुले म्हणून गुळाचा गणपती.परंतु मस्ती इतकी की मीच स्वयंभू असे बेताल वागणे.पण हा मस्तवाल पणा अन सत्तेची नशा मराठी जनतेने खाडकन उतरवला अन जमिनीवर नाही तर जमिनीखालीच घातले.
बाकीच्यांचे तर सोडाच.सगळेच विदूषक.काहीही धोरण नाही,काहीही विचार नाहीत फक्त पुण्याई. पण महाराज ही पुण्याई दरवेळी कामाला येत नाही,तिथं कर्तुत्वच पाहिजे अन नुसते कर्तृत्व ही नाही नम्रता आणि गांभीर्य ही हवे जोडीला नाहीतर होतो फडणवीस !
हाय कमांड महाराष्ट्रात यायला तयार नाही,कारण हिम्मत नाही.महाराष्ट्र म्हणजे इतरांसारखा नाही,तुम्ही काहीही माजूरडे पणा कराल अन तो साथ देईल. भल्याभल्यांची अवस्था त्याने निकाली लावली,अन हे पूर्वीपासून आहे.मराठी जनता सोशिक आहे,खूप आहे परन्तु भंपक नाही.तुमचा घडा भरला की व्यवस्थित तुंमची लायकी दाखवते.या गुणाला आता माझ्या मते फडणवीस प्रयोग म्हणायला हरकत नसावी.असो.विनोद बाजूला ठेऊन जर त्रयस्थ म्हणून पाहिले या प्रसंगकडे तर एक गोष्ट लक्षात येईल,जनतेने कोणालाही बहुमत दिलेले नाही परंतु योग्य तो संदेश दिला आहे.पूर्वापासून महाराष्ट्राची जी इमेज देशाच्या राजकारणात ,घडामोडीत आहे तीच परंपरा या निकालाने कायम ठेवली आहे.म्हणजे तुम्ही कितीही बाहेर आलमगीर असा की ब्रिटिश असा ,आमच्या राज्यात खरे असले तरच किंमत नाहीतर पायदळी.
असो.आता शिवसेनेने समंजस पाने वागून म्हणजे बालिश पणा न करता साहेबांच्या विचाराने वागावे.आता शिवसेना वागणारच तशी कारण पोळलेली आहे,अपमानास्पद वागणुकीने भडकलेली आहे,संजय रौतांसारखं हुशार अन अस्मिता दुखावलेला माणूस आहे.मला विश्वास आहे की शिवसेना आता संधी सोडणार नाही.
बाकी पाठिंब्याचे साहेबांवर सोडा.ते सिद्ध राजकारणी आहेत.कोणतीही गाठ ते अलगद सोडवतील.
मी पुन्हा एकदा मराठी जनतेचे अभिनंदन करतो की आपली परंपरा अबाधित राखली अन आपण काय चीज आहे ते सगळ्या देशाला दाखवले.म्हणजे जो बिनकामाचा गंड तयार झाला होता की या पाखंडी अन बोल घेवड्या पक्षाचा अश्वमेध कोणीही रोखू शकत नाही,तो नुसताच महाराष्ट्राने रोखला नाहीतर त्याची मस्ती ठेचून काढली.
विवेक पगारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा