भेटलीय ती मला
समजून घेणारी, अन वेळेवर दापणारी पण
असेच हवे होते मला
कारण मी असाच
हेलकावे खाणारा
कधी इथं तर कधी तिथं
माझा काही आगा पिछा नाही
स्वत्वात हरवलेला
एक मुसाफिर च
हिच्यामुळं खास झालोय स्थिर
खरं तर स्थिर नाही म्हणता येणार
पण थोडा विचार ही करू शकतो आता
अन थोडा......जाऊदे
कश्याला एवढं डोकं तानायच
भेटली ना मला ती आता
आता कशाची तमा नाही
बेधुंद मी........
करतो वेड्यासारखं मधूनच
पण लगेच चपराक ही भेटते सणसणीत
जागेवरच लगेच
पाहिजे हो , नाहीतर बेताल
पण खरं सांगू का
मलाही आवडत बरका कोणी हुकूमत गाजवणारं
अन हक्काने हक्क गाजवणारं
त्यामुळं मी खूश, जरा जास्तच
पण कधी कधी भीतीने पछाडतो
हे स्वप्न तर नाहीना
नसावं यार
नको लागायला दृष्ट
मानीत नाही पण मला हीही रिस्क घ्यायची नाही.....
Mast
उत्तर द्याहटवानिरागस...
उत्तर द्याहटवा