पृष्ठे

बुधवार, १९ जून, २०१९

"ती राजहांसिनी एक.....💐💐💐"


एक होती अशीच,

पण दिसायला जबर

पण वागणुकीत रबर

कोणीही ताणले तर तानायची लगेच

त्रास व्हायचा बरका तिला..

पण सहन करायची उगीच

जणू स्वत्व च विसरली..

 त्या राजहंसासारखे

बदकां बरोबर स्वतःला बदकच समजायला लागली

खुर्चीला बांधलेल्या हत्तीसारखी

स्वाभिमान विसरलेली

व्यक्त करायला घाबरायची

उगीचच

मान्यताच अश्या भंपक करून ठेवलेल्या...

तिचे दिलखुलास हसूही असेच

वेदनेची किनार असलेले

समजनाऱ्यासच समजणार

पण बोलता बोलता जीवन संपत चालले

मुठीतल्या वाळूसारखे

पण ही अशीच ,उगीचच भेदरल्यासारखी

वर्तुळ वाढले तरी अशीच, स्वत्वात हरवलेली

स्वतःची ओळख विसरलेली...

त्यामुळं आपल्या माणसातच उपरी...

एकटी

मान्यतांची गुलाम

कस्तुरीमृगच जणू

सुगंधाच्या शोधात

स्वतात असूनही

अन इतकी हळवी की पुढचा हमखास रडणार

तिच्या दुःखात समरस होऊन

पण कितीही समजावले तरी स्वतः तशीच हळवी,सोशिक

पण काय कामाचे हे

जे तर जन्माचे लोढणे, गरज नसताना

अन उगीचच त्या भार्याखाली गुदमरतांना

 का असावे असे ,फक्त ती, ती आहे म्हणून

 कधी सुधारू आपण

निसर्ग जाणे

अश्या कित्येक त्या, गुदमरल्या

गेल्या आपलं सगळं ओवाळून

शहीद म्हणता येईल त्यांना....

आपण काहीही नाव देऊ हो

पण त्याचं काय

न्याय देऊ शकतो का

की फक्त वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर फक्त...

शीट.........

एक कोमल जीव गमावतो आपण

पण करणार तरी काय,कारण ती सावित्री रडत असेल स्वर्गात

एवढा स्वाभिमान जगवूनही जर हे मेंढीचे जिने असेल

तर तीही हतबल

कधी बदलणार हे चित्र सोशिक (उगीच स्वयंघोषित) भारतीय नारीचे.....💐💐💐

५ टिप्पण्या: