काल असेच बसलेलो
उगीच एकांतात
भंपक सारखा
आनंद घेत माझ्या भूतकाळाचा
पण नियतीला ते मान्य नसावं
फर्मान लगेच
डिलीट कर बेट्या whatever
ऐकलं , काय ऐकावच लागलं यार
केलं डिलीट सगळं
आता एकटा मी रिक्त
अन असाच फक्त
जर केलं नसतं अन म्हंटल असत केलं
माझं मनच मला खाल्लं असत
की का खोटं बोलला बे तुझ्या हृदयाशी
म्हणून खोटं नाही
कधीही
पण माझा विचार कोणी केला
इकडे भणंग
विचारानेही अन आचारानेही
असे बाकीच्यांचे मत
त्याला भाव कोण देतो
पण आपलेच बोलले तर विदीर्ण होतो
पण मला माहिती, खऱ्या मनाने वागलं
तर खरच भेटत
त्यामुळं मी रिलॅक्स
अन खर्याच्या प्रेमात
नाहीतर कोण कोणाला भाव देत या जमान्यात
जरा खुपच आदर्श जगाच्या आठवणीत
पण भेटेल मला जर मी तसा असेल तर
शुक्रवार, १४ जून, २०१९
काय खरं....💐💐
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा