पृष्ठे

शनिवार, २३ मार्च, २०१९

भंपक मी....

भंपक मी.......

क्षणभंगुर जीवन हे

लगेच पडतो प्रेमात मी सर्वांच्या

कमजोरी आहे की मोठेपणा...अजून समजू शकलो नाही

पण दुनियेच्या नजरेत अजूनही भंपक....

बऱ्याचदा किंवा नेहमीच

व्यक्त केली मी मनाची असलीयत

पण त्यांना वाटले मी शातीर

पण मी होतो तेवढाच निरागस

जसे गुलाबाचे फुल

कुठपर्यंत करू त्यांना कनवीन्स...

पण दुनियेच्या नजरेत अजूनही भंपक....

प्रेम हे निरागस असते हेही ठाऊक त्यांना

पण विश्वास ठेवावा कोणी

हाही प्रश्न आहे

विश्वास ठेवला तर ते भंपक ठरतील

ही भीती त्यांना आहे

मग ठरले तर

भंपक पणा माझाच पेटंट राहील

तुम्ही घाबरू नका

निवांत राहा

भंपक मीच राहील.......💐💐💐💐

२ टिप्पण्या: