Sriyut sanjay sonawani yanchya anita patil yanna dilelya pratikriyela mi dilele uttar.....19 april 2012
आदरणीय सोनवणी साहेब,
आपले अनिता पाटलांना दिलेले उत्तर वाचले आणि आत्मा थंड झाला.अक्षरशः जेव्हापासून मी ती गरळ वाचली होती तेव्हापासून खरेच ध्यानावर नव्हतो.( म्हणजे पु ल,कुसुमाग्रज आणि साने गुरुजींविषयी ) काय करावे या कर्माला अशी स्थिती झाली होती ,काही सुचत नव्हते .या नगांची कीव करावी म्हणावे तर स्वतःची लाज वाटत होती ,यांना काही बरे वाईट लिहावे तर चिखलात दगड मारण्यासारखे होते.आपली संयत आणि खरोखरीच वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया वाचून मी जो मोकळा श्वास घेतो आहे त्याची बहुधा तुम्हाला कल्पना नाही साहेब...! या सगळ्या गोष्टींना उत्तरच सापडत नव्हते.मी जी घुसमट अनुभवत होतो ती आता पार निवळली आहे .
आता या महाभागांविषयी....यांचे जवळपास सर्व लेख मी वाचले आहेत.बर्याच गोष्टी पटल्या हि आहेत.परंतु ब्राह्मणांविषयी काही लिहायचे झाले तर यांच्यात काय वारे घुसते कुणास ठाऊक? मग हे इतके आंधळे होतात कि यांना कश्याचीही शुद्ध राहत नाही.मग ते थोर मोठ्यांचीही अवहेलना करण्यात मागे पुढे पाहत नाहीत.मला मान्य आहे कि पूर्वीपासून ब्राम्हणांनी आपल्या हातात सगळ्या गोष्टी ठेऊन समाजाला नागविले.परंतु आता जमाना बदलला आहे.आपल्यालाही मोठे होऊन बर्याच गोष्टी साध्य करता येतील ,कुणाची मक्तेदारी नाही.परंतु तेच रडगाणे गाऊन किंवा कुणाच्या नावाने गळे काढून फक्त मनोरंजन साध्य होईल ,बदल नाही..! आणि मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? आणि आपला बहुजन समाजाला मनोरंजनाशिवाय बाकी काही नकोय. कारण गुंठे विकून मौज मजा करायची त्यात असले लेखन नजरेस पडले तर अजूनच बहार...अनिता ताई तुम्हीच विचार करा जरा कि याने आपले खरे प्रबोधन होतेय का ? खरे तर सुरुवातीला तुमचे विचार वाचून कोण हि रणरागिणी ? म्हणून आमच्या मित्र मंडळात कौतुक हि झाले होते मात्र नंतर नंतर गाडी रुळावरून ढळली आणि आपणही ब्राम्हणांच्या वाटेने निघालात.अहो या बाबतीत मला एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एव्हढे बलाढ्य ब्रिटीश ,कधी काळी जगावर राज्य करीत होते परंतु आपल्याच गुर्मीत मश्गुल राहून आज कुठेच्या कुठे रसातळाला गेले ते..शेवटी निसर्गच पर्यावरणाचा समतोल ठेवतो मग तो कुठल्याही रुपात..!आणि ब्राम्हणांचे काय वेगळे आहे .कधी काळी सगळा कारभार आपल्याच हातात ठेऊन यांनी साऱ्या जनतेला वेठीस धरले , आज यांची परिस्थिती काय आहे ? आणि आपण त्याच गुल्काड्या ओढून त्यांना महत्वच देतोय.. एखादी काडी मोडून आपली काडी मोठी दाखवण्यापेक्षा आपलीच काडी इतकी मोठी करू कि अन्य खुज्या वाटतील...
आणि आता विषय या साहित्यिकांचा ...अहो सर्व यांचेच राज्य असतांना यांनी सकल जणांचा विचार केला , हि काही लहान सहान गोष्ट नव्हे.ते हि त्याच मार्गाने गेले असते तर कोणी त्यांचे काही वाकडे करू शकले नसते.बाबा आमटे,साने गुरुजी,पु ल ,अत्रे इ. यांचे कार्य/लेखन बघितले तर त्यांचे मोठेपण लक्षात येईल.
असो आता संपवतो, सोनवणी साहेब पुन्हा एकदा आभार कारण आता समाधान अनुभवतोय..आणि अभिनिवेशात बरेच असंबंध वाटण्याचा संभव आहे ,सांभाळून घ्या....
आणि हो अनिता ताई ,लहान तोंडी मोठा घास घेतोय पण राहवत नाही ,तुमच्या लेखनातून प्रबोधन घडवा ,सवंग मनोरंजन नाही...!!!
And reply from Shri.Sanjay Sonawani
Spartan ji, Thanks for your response, full of humanatirian sentimens and guidance to all those think abusing all Brahmins is a kind of revolution. I am Sure, Anita ji too will change someday and become far more creative than destructive.
Thanks again.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा